क्रीडा

भारतीय महिलांचे क्लीन स्विपचे लक्ष्य; वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील शेवटचा सामना आज

एकदिवसीय मालिकेत २-० अशी आघाडी घेणारा भारतीय महिला संघ शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे.

Swapnil S

वडोदरा : एकदिवसीय मालिकेत २-० अशी आघाडी घेणारा भारतीय महिला संघ शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पाहुण्यांना क्लीन स्विप देण्याचा प्रयत्न भारतीय महिला संघााचा आहे.

तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय महिला संघाने घरच्या मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली आहे.

धावसंख्या तीनशे पार नेण्याची क्षमता भारतीय संघामध्ये आहे. स्मृती मन्धानासोबत सलामीला फलंदाजीला येणारी प्रतिका रावल पदार्पणाच्या सामन्यात धावा जमवण्यात अपयशी ठरली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात तिच्या बॅटमधून धावा निघाल्या होत्या.

हरलीन देओल दीर्घकाळापासून खेळत आहे. परंतु एवढ्या कालावधीनंतर गेल्या सामन्यातच तिला पहिले एकदिवसीय शतक झळकावता आले. कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतीतून सावरली असली तरी तिला अद्याप मोठी खेळी खेळता आलेली नाही. गोलंदाजीत रेणुका ठाकूर, तितास साधू या प्रभावी गोलंदाजी करत आहेत.

भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी वेस्ट इंडिजला दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करावे लागेल. पहिल्या दोन्ही सामन्यांत त्यांच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे भारताने आपली धावसंख्या तीनशेपार नेली आहे. त्यामुळे हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघाला सर्व आघाड्यांवर सुधारणा करणे आवश्यक आहे.

भारत : स्मृती मन्धाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, प्रिया मिश्रा, उमा चेत्री, मिन्नू मणी, तेजल हसबनीस, तनुजा कंवर.

वेस्ट इंडिज : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, रशादा विल्यम्स, डिआंड्रा डॉटिन, नेरिसा क्राफ्टन, शेमेन कॅम्पबेले (यष्टीरक्षक), आलिया ॲलेने, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल, एफे फ्लेचर, शबिका गजनाबी, चिनेले मॅनडी हेन्री, अश्मिनी मुनिसार.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजता सुरू होणार

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त