प्रातिनिधिक छायाचित्र  
क्रीडा

IPL च्या मैदानाबाहेरील थरारावर आज सर्वांच्या नजरा

इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामासाठी अद्याप पाच महिन्यांचा अवधी आहे. मात्र त्यापूर्वी शनिवारी मैदानाबाहेर रंगणाऱ्या थराराकडे सर्वांचे लक्ष असेल. आयपीएलमधील १० संघांना शनिवारी आगामी हंगामासाठी आपापल्या संघात कायम राखलेल्या (रिटेन) खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे.

Swapnil S

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामासाठी अद्याप पाच महिन्यांचा अवधी आहे. मात्र त्यापूर्वी शनिवारी मैदानाबाहेर रंगणाऱ्या थराराकडे सर्वांचे लक्ष असेल. आयपीएलमधील १० संघांना शनिवारी आगामी हंगामासाठी आपापल्या संघात कायम राखलेल्या (रिटेन) खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे.

दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षीही एप्रिल व मे महिन्यात आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यापूर्वी डिसेंबरमध्ये खेळाडूंचे मिनी ऑक्शन म्हणजेच लिलावप्रक्रिया होणार आहे. त्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना आपालल्या चमूत कायम राखलेल्या खेळाडूंची यादी (रिटेन) जाहीर करायची आहे. तसेच ट्रेड विंडो म्हणजेच खेळाडूंची अदलाबदल करण्याची किंवा खेळाडू ज्या किमतीला गेल्या हंगामात विकला गेला, तेवढी रक्कम समोरील संघाला देण्याची मुभाही सध्या आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व संघांनी ट्रेड पूर्ण करण्यासह खेळाडूंची यादीही बीसीसीआयकडे द्यायची आहे.

दरम्यान, खेळाडूंच्या अदलाबदलीत आतापर्यंत मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सकडून २ कोटी रुपयांत शार्दूल ठाकूरचा करार केला. त्यामुळे मुंबईचा संघ लखनऊला २ कोटी रुपये देणार आहे. शार्दूलने गेल्या हंगामात १० सामन्यांत १३ बळी मिळवले. तसेच वानखेडेवर तो उपयुक्त फटकेबाजी करू शकतो. शार्दूल हा मूळचा मुंबईकर आहे. तो सध्या मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधारही आहे. पालघर ते मुंबई असा एकेकाळी दररोज शार्दूल प्रवास करायचा. मात्र आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची कधीच संधी लाभली नव्हती. शार्दूलव्यतिरिक्त, मुंबईने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज शर्फेन रुदरफोर्डलाही संघात सहभागी केले. रुदरफोर्ड गेल्या हंगामात गुजरातचा भाग होता. त्याला २.४ कोटी रुपयांत मुंबईने खरेदी केले आहे.

संजू सॅमसन व रवींद्र जडेजा यांच्या संघबदलाची हवादेखील आहे. ३१ वर्षीय सॅमसन राजस्थान रॉयल्सला सोडून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यास राजी असल्याचे समजते. त्या बदल्यात चेन्नईचा संघ राजस्थानला ३६ वर्षीय अष्टपैलू जडेजासह इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनदेखील देण्यास तयार आहे. त्याशिवाय हैदराबाद मोहम्मद शमीला १० कोटी रुपयांत लखनऊ संघास देणार असल्याचे समजते. अर्जुन तेंडुलकरच्या ट्रेडविषयीही चर्चा सुरू आहे.

  • वेळ : सायंकाळी ५ वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब