IPL च्या अंतिम सामन्यासाठी पुन्हा अहमदाबादलाच पसंती; गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार फायनल  
क्रीडा

IPL च्या अंतिम सामन्यासाठी पुन्हा अहमदाबादलाच पसंती; गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार फायनल

आयपीएलच्या १९व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा अहमदाबादलाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला होईल.

Krantee V. Kale

मुंबई : आयपीएलच्या १९व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा अहमदाबादलाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला होईल.

२०२२, २०२३, २०२५ या वर्षी अहमदाबादला आयपीएलचा अंतिम सामना झाला होता. २०२४मध्ये कोलकाताने जेतेपद मिळवल्यावर २०२५चा अंतिम सामना ईडन गार्डन्सला होणे अपेक्षित होते. मात्र पहलगाम हल्ल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव अहमदाबादला अंतिम सामना रंगला. तसेच २०२५मध्ये बंगळुरूने जेतेपद मिळवल्यावर यंदाचा अंतिम सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल, असे अपेक्षित होते. मात्र बंगळुरूतील आमदारांची तिकिटांसाठी मागणी व तेथील मर्यादित प्रेक्षकक्षमतेचा विचार करता पुन्हा अहमदाबादला प्राधान्य देण्यात आले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील तसेच २०२६च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामनासुद्धा अहमदाबादलाच झाला होता.

दरम्यान, बीसीसीआयने बुधवारी आयपीएलच्या बाद फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २६ मे रोजी क्वालिफायर-१ सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होईल. मग २७ मे रोजी एलिमिनेटर लढत मुल्लानपूर (न्यू चंदिगड) येथे होईल. २९ मे रोजी क्वालिफायर-२ लढतसुद्धा मुल्लानपूरलाच खेळवण्यात येईल. मग रविवार, ३१ मे रोजी अहमदाबादला अंतिम सामना रंगेल. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या शहरांना यावेळी बाद फेरीच्या सामन्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी