क्रीडा

कोल्हापूरचा ओंकार ज्युनियर महाराष्ट्र श्री

पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत १९ जिल्ह्यांतील १२४ स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने जेतेपद पटकावले असले तरी या स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व होते.

Swapnil S

पुणे : कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या ४४ व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नाशिकची कविता शेवरे अव्वल आली.

पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत १९ जिल्ह्यांतील १२४ स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने जेतेपद पटकावले असले तरी या स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व होते. ५५ ते ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याची किमया उपनगरच्याच खेळाडूंनी दाखवली. चंद्रशेखर धावडे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, चंद्रशेखर धावडे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे डॉ. संजय मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद चव्हाण, राजेश सावंत, श्रेयश धावडे, अनिल शिंदे, किरण भिसे, इलियास शेख, योगेश कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

५५ किलो : १. ओमकार भानसे (मुंबई उपनगर), २. हनुमान भगत (रायगड), ३. हर्षद देशमुख (रायगड); ६० किलो : १. सिद्धेश सुर्वे (मुंबई उपनगर), २. प्रणय मुंडकर (रायगड), ३. रोशन पाटील (रायगड); ६५ किलो : १. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर), २. अभय चौहान (नगर), ३. प्रतीक पाटील (पुणे); ८० किलो : १. ओंकार पाडळकर (कोल्हापूर), २. मयुर शिंदे (नाशिक), ३. ऋत्विक जाधव (पुणे).

मेन्स मास्टर्स (खुला गट)

१. कुमम कोयंबा (प. ठाणे), २. चिराग पाटील (पालघर), ३. नितीन ढाकळे (पुणे)

मेन्स फिजिक (खुला गट)

१. ऋत्विक जाधव (पुणे), २. आदित्य ठाणे (मुंबई), ३. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर),

मेन्स फिजिकल चॅलेंज (खुला गट) : १. सुरेश दासरी (मुंबई उपनगर),

२. योगेश मेहेर (पालघर), ३. रवींद्र कदम (मुंबई)

महिला (खुला गट)

१. कविता शेवरे (नाशिक), २. रसिका हजारे (रायगड), ३. नंदिनी कांबळे (रायगड)

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन