क्रीडा

मध्यप्रदेश रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत,23 वर्षानंतर फायनलमध्ये प्रवेश मिळाला

वृत्तसंस्था

रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्यप्रदेशने बंगालचा १७४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. १९९९ नंतर पहिल्यांदाच मध्यप्रदेश रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला. मध्यप्रदेशच्या पहिल्या डावात ३२७ चेंडूंत १६५ धावा करणाऱ्या हिमांशू मंत्रीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

मध्यप्रदेशने पहिल्या डावात ३४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर बंगालला २७३ धावांपर्यंतच मजल मारती आली होती. पहिल्या डावात ६८ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने २८१ धावा करत बंगालपुढे विजयासाठी ३५० धावांचे आव्हान ठेवले. मात्र बंगालचा दुसरा डाव ६५.२ षटकांत १७५ धावातच संपुष्टात आला. मध्यप्रदेशच्या कुमार कार्किकेयने दुसऱ्या डावात ६७ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या या स्पेलमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. कार्तिकेयबरोबरच गौरव यादवने तीन बळी टिपले, तर सारांश जैनने दो विकेट्द घेतल्या. कार्तिकेयने संपूर्ण सामन्यात आठ विकेट घेत मध्यप्रदेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मध्यप्रदेश १९९९ नंतर दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. १९९९ मध्ये मध्यप्रदेशला कर्नाटककडून ९६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

बंगालकडून पहिल्या डावात मनोज तिवारी (१०२) आणि शाहबाज अहमद (११६) धावांची शतकी खेळी केली होती. मध्यप्रदेशकडून पहिल्या डावात हिमांशु मंत्रीने १६५ धावांची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशकडून रजत पाटीदारने ७९ तर आदित्य श्रीवास्तवने ८२ धावांची खेळी केली. बंगालचा कर्णधार अभिमन्यू इश्वरनने १५७ चेंडूंत ७८ धावांची झुंजार खेळी केली.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का