क्रीडा

माजी कबड्डीपटू वसंत ढवण यांचे निधन

अमृतसर येथे १९६१साली झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ते प्रथम महाराष्ट्राकडून खेळले. त्यांनी सलग सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे जेष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई, तीन मुलगे, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे.

तीन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ मार्च रोजी दुपारी १च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ढवण हे मूळचे कणकवलीचे. परिस्थितीमुळे ते वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला आले. मामा शिवराम पिळणकर यांच्या आश्रयाला ते राहिले. लोअर परेल येथील श्रीराम कबड्डी संघाकडून त्यांनी कबड्डी खेळाला सुरुवात केली. फिनिक्स मिलकडून ते १० वर्षे कबड्डी खेळले. त्यानंतर काही काळ लक्ष्मीरतन या संघाकडून व त्यानंतर त्यांना महिंद्र संघाकडून खेळाडू म्हणून नोकरी देण्यात आली.

अमृतसर येथे १९६१साली झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ते प्रथम महाराष्ट्राकडून खेळले. त्यांनी सलग सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. पण त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी १९७०साली लाभले. डावा कोपरा रक्षक असलेले ढवण चवढा व बॅक काढण्यात माहिर होते. ते अष्टपैलू खेळाडू होते. विरार येथे ढवण यांनी श्रीराम कबड्डी संघाची स्थापना केली होती. त्यासंघाचा महाराष्ट्रात दबदबा आजही आहे.

BMC Budget 2026 : करवाढ नसलेला अर्थसंकल्प; महापालिकेचा ८० हजार ९५२.५६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

Mumbai : महापौरांकडून स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; ठाकरेंचे ३, काँग्रेसचा १, भाजपचे ४ तर शिंदेंचे २ नगरसेवक

मुंबईच्या प्रदूषणावर तातडीने उपाययोजना; 'डायनॅमिक मॉनिटरिंग' यंत्रणा विकसित करण्याचे BMC ला निर्देश

अनिल अंबानी यांची ३,७१५ कोटींची मालमत्ता जप्त; आरकॉमशी संबंधित बँक फसवणूकप्रकरणी कारवाई; ED चा दणका