क्रीडा

अंतिम सामन्यात रणजी करंडक उंचावण्यास मुंबई उत्सुक

मध्य प्रदेशने तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारल्याने तेही करंडकावर नाव कोरण्यासाठी आसुसलेले आहेत

वृत्तसंस्था

के. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी करंडकाचा अंतिम सामना बुधवारपासून सुरू होत असून मध्यप्रदेशविरुध्दचा हा सामना जिंकून ४२व्यांदा रणजी करंडक उंचावण्यास मुंबई उत्सुक आहे. मध्य प्रदेशने तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारल्याने तेही करंडकावर नाव कोरण्यासाठी आसुसलेले आहेत.

मध्यप्रदेशने १९५३ मध्ये रणजी करंडक पटकाविला होता. प्रदीर्घ कालखंडानंतर दुसऱ्यांदा करंडक मिळविण्यासाठी मध्यप्रदेशनेही जय्यत तयारी केली आहे.

मध्यप्रदेशने १९९८-९९ मध्ये रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मुंबईचा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील हा ४७ वा पराभव आहे. मध्य प्रदेशने बंगालला नमवून अंतिम फेरीत प्रवषा केला आहे, तर मुंबईने उत्तर प्रदेशला नमवून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मुंबईने अंतिम फेरीच्या ४६ लढतींपैकी ४१ लढती जिंकल्या आहेत. यंदाच्या हंगामात मुंबईने ड गटात पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली शानदार कामगिरी केली. गटात अव्वल स्थान मिळविले. मुंबईने खेळेलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. मुंबईने गोवा आणि ओडिशा यांना पराभूत करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. सौराष्ट्रविरुध्दचा सामना अनिर्णित राहिला. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने उत्तराखंडवर विक्रमी ७२५ धावांनी विजय मिळविला. उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुध्द मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान पटकाविले.

मध्यप्रदेशने या हंगामाची सुरूवात शानदार केली. पहिल्या सामन्यात गुजरातला १०६ धावांनी नमविले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मेघालयचा एक डाव आणि ३०१ धावांनी पराभव केला. केरळविरुध्दचा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर पंजाबचा १० गडी राखून पराभव केला. बंगालविरुध्दच्या उपांत्य सामन्यात १७४ धावांनी विजय मिळवून मध्यप्रदेशने अंतिम फेरी गाठली.

मध्यप्रदेशने १९५३ पासून आणि मुंबईने २०१५-१६ पासून रणजी करंडक उंचावलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हा करंडक पटकाविण्यासाठी अतटीतटीची लढत होईल, अशी अपेक्षा आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल