नुवान तुशारा  संग्रहित छायाचित्र
क्रीडा

IPL साठी नुवान तुशारा श्रीलंकन बोर्डाविरोधात कोर्टात; RCB कडून खेळण्यासाठी परवानगी न देण्याच्या निर्णयाला आव्हान

तुशाराने श्रीलंकन क्रिकेट मंडळासोबतचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ३१ मार्चपर्यंतच होता असे सांगितले. श्रीलंकन क्रिकेट मंडळाशी ३१ मार्च, २०२६ रोजी करार संपुष्टात आल्यावर ते मला पुन्हा करारबद्ध करेपर्यंत रोखू शकत नाहीत, असे तुशाराने...

Krantee V. Kale

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुशारा याने न्यायालयात धाव घेतली आहे. श्रीलंकन क्रिकेट मंडळाने (एसएलसी) ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास मनाई केल्याने त्याविरोधात तुशाराने कोलंबो कोर्टात तक्रार नोंदवली आहे.

तुशारा तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरल्यामुळे श्रीलंकन बोर्डाने त्याला भारतात जाण्यास नकार दिल्याचे समजते. मात्र तुशाराने श्रीलंकन क्रिकेट मंडळासोबतचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ३१ मार्चपर्यंतच असल्याचे सांगितले. श्रीलंकन क्रिकेट मंडळाशी ३१ मार्च, २०२६ रोजी करार संपुष्टात आल्यावर ते मला पुन्हा करारबद्ध करेपर्यंत रोखू शकत नाहीत, असे मत तुशाराने व्यक्त केले आहे. तसेच आपल्याला आयपीएलमध्ये खेळू द्यावे, अशी मागणीही त्याने केली आहे. त्यामुळे एसएलसीचे अध्यक्ष शमी सिल्व्हा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना ९ एप्रिल रोजी कोर्टात उपस्थित रहावे लागणार आहे.

श्रीलंकेचा मथीशा पाथिरानादेखील तंदुरुस्त असल्याने अद्याप भारतात दाखल झालेला नाही. तो कोलकाता संघाकडून खेळणार होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला अद्याप क्रिकेट बोर्डाने भारतात दाखल होण्याची परवानगी दिलेली नाही. एकूणच तुशाराच्या कृतीमुळे हे प्रकरण आणखी पेटणार आहे.

दरम्यान, २८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच पाच लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. त्यामुळे नाणेफेक व दवाचा घटक यावेळी निर्णायक ठरत आहे. तुशाराच्या अनुपस्थितीत बंगळुरूने पहिल्या लढतीत हैदराबादला सहज धूळ चारली आहे.

सँटनर मुंबईच्या ताफ्यात दाखल

न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल, असे समजते. मुंबई-दिल्ली यांच्यात शनिवारी दुपारी ३.३० वाजता अरुण जेटली स्टेडियमवर लढत होईल. टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका झाली होती. २५ मार्च रोजी ही मालिका संपली. त्यामुळे सँटनरने काही दिवसांची अतिरिक्त विश्रांती मागितली होती. अखेर आता तो दिल्लीत दाखल झाला असून मुंबईच्या संघात शनिवारी खेळताना दिसू शकतो.

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात; प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी

Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

Mumbai : शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता, सुरक्षितता वाढणार; KEM रुग्णालयात प्रगत ‘व्हेसल सीलर’ तंत्रज्ञान

Mumbai : नालेसफाईच्या कामात तीन तेरा; मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात अपुरी यंत्रणा, सत्ताधारी पक्षाच्या पाहणी दौऱ्यात पोलखोल