Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

‘सीएफसी@होम’ आणि ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ या नागरीकाभिमुख संगणकीय प्रणालींचे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण
Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण
Published on

मुंबई : ‘सीएफसी @ होम’ आणि ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ या नागरीकाभिमुख संगणकीय प्रणालींचे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानुसार मुंबईकरांना म्हाडाकडे घरबसल्या तक्रार करता येणार आहे.

म्हाडा मुख्यालयात आयोजित ‘गो लाइव्ह’ कार्यक्रमात नागरिकांसाठी या दोन्ही प्रणाली आजपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सरकारच्या जीपीआर २.० धोरणानुसार पारंपरिक कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, वेगवान करून त्या डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या दिशेने म्हाडाने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

वेळेची बचत, ऑनलाइन पाठपुरावाही

दोन्ही प्रणालीनुसार घरबसल्या अथवा कुठूनही अर्ज, तक्रारी तसेच इतर कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून म्हाडाकडे पाठवता येणार आहेत. हे सर्व डिजिटल माध्यमातून करता येणार असून शुल्क भरणा व माहितीही उपलब्ध होणार आहे. यामुळे पाठपुरावा करता येणार लोकांच्या वेळेची बचत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in