क्रीडा

पर्थमध्ये पाकिस्तानचे पानीपत

झिम्बाब्वेने दिलेले १३१ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानला २० षटकांत ८ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

वृत्तसंस्था

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चित्तथरारक लढतीत झिम्बाब्वेने पाकिस्तानवर अवघ्या एका धावेने मात करत धक्कादायक विजयाची नोंद केली. सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तर झिम्बाब्वेने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवून वेगळीच चुरस निर्माण केली आहे.

झिम्बाब्वेने दिलेले १३१ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानला २० षटकांत ८ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी एक धाव काढली. परंतु दुसऱ्या धावेला मेन स्ट्राइकवरील फलंदाज धावचीत झाल्यामुळे ते पराभूत झाले. फिरकीपटू सिकंदर रझा (३/२५) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ८ बाद १३० धावा केल्या. सीन विल्यम्सने त्यांच्यासाठी सर्वाधिक ३१ धावांचे योगदान दिले. मग पाकिस्तानने बाबर आझम (४), मोहम्मद रिझवान (१४) यांना स्वस्तात गमावले. शान मसूद (४४) आणि मोहम्मद नवाझ (२२) यांनी झुंजार खेळी साकारली. मात्र ३ चेंडूंत ३ धावांची गरज असताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. ब्रॅड इव्हान्सने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करून झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला. यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसह चाहत्यांचे चेहऱ्यावर जे घडले, त्यावर विश्वासच बसणार नाही, असे हावभाव उमटले. तर झिम्बाब्वेच्या खेळाडूंना अश्रू आवरणे कठीण गेले.

मुंबईचा ‘वाली कोण’?

स्त्रीशिक्षण अजूनही अपूर्णच आहे का?

आजचे राशिभविष्य, १० जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नाश्त्याला झटपट आणि चविष्ट पर्याय; नेहमीच्या पोह्यांपेक्षा बनवा खमंग 'मसाला पोहे'

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?