@16Sreejesh/X
क्रीडा

ज्युनियर प्रशिक्षकासाठी मोदींकडून श्रीजेशला पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघातील महान खेळाडू पी. आर. श्रीजेश याला पत्र लिहून त्याने देशासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघातील महान खेळाडू पी. आर. श्रीजेश याला पत्र लिहून त्याने देशासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. त्याचबरोबर अलीकडेच निवृत्ती पत्करलेल्या श्रीजेशने राष्ट्रीय ज्युनियर संघाचा नवा प्रशिक्षक होण्याची जबाबदारी स्वीकारावी, यासाठी पाठिंबा दिला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावल्यानंतर श्रीजेशने आपल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीचा समारोप केला. टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याचे हे सलग दुसरे कांस्यपदक ठरले. गोलरक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारा श्रीजेश हा भारताची ‘द वॉल’ म्हणून ओळखला जात असून त्याने संघासाठी दिलेले योगदान अभूतपूर्व असेच आहे. त्याच्या कामगिरीमुळे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन रौप्यपदके पटकावता आली. निवृत्तीनंतर हॉकी इंडियाने श्रीजेशची ज्युनियर पुरुष संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मोदींनी पत्रात म्हटले की, “नव्या भूमिकेतही तू जीव ओतून काम करशील, यात तिळमात्र शंका नाही. तुझी ही भूमिका प्रभावी आणि प्रेरणादायी ठरेल, अशीच खात्री आहे. तू भारतीय संघाकडून जेव्हा खेळत होतील, तेव्हा प्रत्येक वेळी मी तुझ्या कामगिरीची स्तुती करत आलो आहे.”

या पत्रानंतर श्रीजेशनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. “निवृत्तीनंतर खुद्द पंतप्रधानांनी मला पत्र लिहून माझी स्तुती केली, हे पाहून मी भारावलो आहे. हॉकी हे माझे आयुष्य आहे आणि खेळाच्या भल्याकरिता मी यापुढेही काम करण्यासाठी उत्सुक आहे. भारताला हॉकीत महासत्ता बनवण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन,” असे तो म्हणाला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प