क्रीडा

भारतीय चाहत्यांना वर्णद्वेषी वागणूक, अनेकांनी व्यक्त केला संताप

वृत्तसंस्था

गेल्या वर्षीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पुनर्नियोजित पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय चाहत्यांविषयी वर्षद्वेषी वक्तव्ये करण्यात आली. याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.

कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या काही समर्थकांनी भारतीय चाहत्यावर वर्णद्वेषी टीका करीत हुज्जत घातली होती. सोशल मीडियावर अनेकांनी अशाप्रकारच्या तक्रारी केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील तक्रारी केल्या. इंग्लंड क्रिकेट बोर्डाला टॅग करुन करण्यात आले. या प्रकरणामध्ये सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

सामना पाहण्यासाठी मैदानामध्ये आलेल्या एका प्रेक्षकाने स्टॅण्डमधील फोटो पोस्ट करत, “येथे भारतीय चाहत्यांना वर्णद्वेषी वागणूक दिली जात आहे. ब्लॉक क्रमांक २२ मध्ये हा प्रकार घडला. आम्ही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन त्यांना किमान १० वेळा हे कोण बोलले, त्याबद्दलची माहिती दिली. मात्र त्यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद न देता जागेवर बसण्यास सांगितले.”

यॉर्कशायरचा क्रिकेटपटू अझीम रफिक म्हणाला की, हे प्रकरण फार क्लेषदायक आहे. याच क्रिकेटपटूने मागील वर्षी यॉर्कशायर क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी वागणूक मिळत असल्याची टीका केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नियमांमध्ये मोठे बदल केले होते.

कुशल मालदे नावाच्या एका भारतीय प्रेक्षकाने इंग्लंडच्या चाहत्यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा दावा केला. त्याने सांगितले की, मला प्रेक्षकांमधील घोषणाबाजी आवडते. मात्र सामन्यादरम्यान आमच्याविरोधात फारच वाईट शब्दांचा वापर करण्यात आला. काही शब्द फारच वाईट होते. तरीही या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय चाहत्यांनाच खाली बसण्यास सांगून आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांना बडबड सुरु ठेऊ दिली.

मैदानाचे विशेष कार्यकारी अधिकारी स्टुर्ट कॅन म्हणाले की, हा प्रकार समजताच मला मोठा धक्का बसला. आम्ही हे मैदान सर्वांसाठी सुरक्षित करण्याचे प्रयत्न करीत होतो. मी स्वत: हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या व्यक्तीचे ट्विट्स पाहून त्याच्याशी चर्चा केली. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही नेमके काय घडले, याची माहिती घेत आहोत. कॅन पुढे म्हणाले की, स्टेडियममध्ये कोणालाही अशाप्रकारच्या वर्णद्वेषाचा सामना करावा लागता कामा नये. आमच्याकडे सर्व माहिती आल्यानंतर आम्ही या प्रकरणात योग्य ती कारवाई करु. भारतीय समर्थकांच्या भारत आर्मीनेही ट्विटरवरुन अनेक भारतीय समर्थकांना एका छोट्या गटाने लक्ष्य केल्याचे नमूद केले आहे.

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला

थारा नाही; बोर्डाचा निर्वाळा

याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला कोणताही थारा नाही, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया