क्रीडा

बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबी मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह अन्य तिघांना अटक केली. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ‘डीएनए नेटवर्क्स’शी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली.

Swapnil S

बंगळुरू : बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह अन्य तिघांना अटक केली. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ‘डीएनए नेटवर्क्स’शी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली. मात्र ते घरी नव्हते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

निखिल सोसाळे हे विमानाने मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे. ‘डीएनए’चे इतर ३ कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांना क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात आणले असून तेथे त्यांची चौकशी सुरू आहे. चेंगराचेंगरीत निष्काळजीपणाचे कारण, नियम, कार्यक्रमाची परवानगी आणि सुरक्षा मानकांशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष याबाबत पोलीस तपास करत आहेत.

१८ वर्षांनी आरसीबीने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले. यानंतर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टेडियमबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी झाली. चेंगराचेंगरीत ११ जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. पोलिसांनी आरसीबी, केएससीए आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून तपास सीआयडीकडे सोपवला आहे.

दरम्यान, बंगळुरू संघाकडून मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करतानाच सर्वांच्या दुखात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने यंदा संपूर्ण हंगामात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ केला. त्यांनी संपूर्ण हंगामात प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात एकही लढत गमावली नाही. त्याशिवाय अनेकदा सामन्यात पिछाडीवर असतानाही दडपणाखाली कामगिरी उंचावून संघाला मार्ग दाखवला. त्यामुळेच त्यांनी याचा जल्लोष केला, मात्र यास गालबोट लागले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

मुख्यमंत्र्यांचे सचिव गोविंदराज यांची हकालपट्टी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले राजकीय सचिव के. गोविंदराज यांची हकालपट्टी केली आहे, तर गुप्तचर विभागाचे प्रमुख हेमंत निंबाळकर यांची बदली केली. त्यांच्या जागी रवी. एस यांची नियुक्ती झाली. या चेंगराचेंगरीत जखमी झालेले रोलन गोम्स यांनी कब्बन पार्क पोलीस ठाण्यात आरसीबी, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन व डीएनए यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ता स्नेहमयी कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना १६ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’