क्रीडा

चेंगराचेंगरीला RCB जबाबदार ; CAT चा ठपका

बंगळुरू चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) जबाबदार आहे, असा ठपका केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाने ( Central Administrative Tribunal - CAT ) ठेवला व निलंबित आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्रीय प्रशासकीय समितीच्या दोन सदस्यीय पीठाने आरसीबीवरच चेंगराचेंगरीचा ठपका ठेवला आहे.

Swapnil S

बंगळुरू : बंगळुरू चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) जबाबदार आहे, असा ठपका केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाने ( Central Administrative Tribunal - CAT ) ठेवला व निलंबित आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्रीय प्रशासकीय समितीच्या दोन सदस्यीय पीठाने आरसीबीवरच चेंगराचेंगरीचा ठपका ठेवला आहे.

लवादाने सांगितले की, पोलीस देव किंवा जादूगार नाही. पोलिसांना सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. त्यामुळे मोठा जमाव नियंत्रित करण्याची आशा त्यांच्याकडून बाळगता येणार नाही. ‘आरसीबी’ने विजयी परेड काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही. त्यांनी अचानक सोशल मीडियावरून विजयी परेडची घोषणा केली. त्यामुळे ५ लाख लोकांची गर्दी जमण्यासाठी ‘आरसीबी’ जबाबदार आहे, असा ठपका लवादाने ठेवला.

या प्रशासकीय पीठातील न्यायमूर्ती बी. के. श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती संतोष मेहरा यांनी सांगितले की, “आरसीबीने किंवा मेसर्स डीएनए एंटरटेन्मेंट नेटवर्क प्रा. लि. कंपनीने विजयी मिरवणूक काढण्यासाठी नियामक संस्थेची परवानगी घेतली नव्हती. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. त्यामुळे काही नागरिकांना नाहक प्राण गमवावे लागले.”

४ जून रोजी ‘आरसीबी’च्या विजयी परेडमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ७५ जण जखमी झाले. याप्रकरणी आयपीएस अधिकारी व अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांना निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाला त्यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादामध्ये आव्हान दिले. पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन हे ठोस पुराव्यामुळे केले नाही. त्यामुळे हे निलंबन रद्द केले जात आहे, असे लवादाने नमूद केले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल