AP
क्रीडा

बटलरच्या अनुपस्थितीत सॉल्ट इंग्लंडचा कर्णधार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका आजपासून सुरू

इंग्लंडचा कर्णधार तसेच धडाकेबाज फलंदाज जोस बटलर उजव्या पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार आहे.

Swapnil S

लंडन : इंग्लंडचा कर्णधार तसेच धडाकेबाज फलंदाज जोस बटलर उजव्या पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत बटलरचाच सलामीचा साथीदार फिल सॉल्टकडे इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला बुधवारपासून साऊदम्पटन येथे प्रारंभ होईल.

मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ सध्या युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी नुकताच स्कॉटलंडला टी-२० मालिकेत ३-० अशी धूळ चारली. आता इंग्लंडविरुद्धच्या ३ टी-२० सामन्यानंतर ते ५ एकदिवसीय लढतीही खेळणार आहेत. या मालिकेसाठी पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली असून प्रामुख्याने नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे बटलर एकदिवसीय मालिकेसही मुकण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास त्याविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही.

वेळ : रात्री ११ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनी

इंग्लंड : फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बीथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करम, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, सकिब महमूद, डॅन मौसले, जेमी ओव्हर्टन, आदिल रशिद, रीस टॉप्ली, जॉन टर्नर.

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हिएर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेसर-मॅकगर्क, कॅमेरून ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टोइनिस, ॲडम झाम्पा.

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल