क्रीडा

अर्थवचे दुसरे शतक; विदर्भाची उत्तम सुरुवात

या सामन्यात ध्रुव शोरे (१२) लवकर माघारी परतला. मात्र अथर्व व यश राठोड (९३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १८४ धावांची भागीदारी रचली.

Swapnil S

नागपूर : सलामीवीर अथर्व तायडेने (२४४ चेंडूंत १०९ धावा) हंगामातील दुसरे व प्रथम श्रेणी कारकीर्दीतील तिसरे शतक साकारले. त्यामुळे विदर्भाने कर्नाटकविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ८६ षटकांत ३ बाद २६१ धावा केल्या आहेत. या सामन्यात ध्रुव शोरे (१२) लवकर माघारी परतला. मात्र अथर्व व यश राठोड (९३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १८४ धावांची भागीदारी रचली. यशला शतकाने हुलकावणी दिली. अथर्वने मात्र १६ चौकार व १ षटकारासह शतकाची वेस ओलांडली. खेळ संपायला ७ षटके शिल्लक असताना अथर्व बाद झाला. दिवसअखेर करुण नायर ३०, तर कर्णधार अक्षय वाडकर २ धावांवर खेळत आहे. याव्यतिरिक्त, सौराष्ट्र-तमिळनाडू, मध्य प्रदेश-आंध्र प्रदेश यांच्यातही उपांत्यपूर्व लढती सुरू आहेत.

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं का? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर