क्रीडा

Shubman Gill : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार? डेंग्यूवर केली मात करत सरावाला सुरुवात

शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाल्याने त्याला विश्वचषकातील दोन सामन्यांना मुकावं लागलं होतं.

नवशक्ती Web Desk

भारतीय क्रिकेट(Team India) संघाचा आघाडीचा सलामी फलंदाज शुभमन गिलला(Shubhaman Gill) डेंग्यूची लागण झाल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची आणि त्यांच्या चाहत्याची मोठी निराशा झाली होती. आता मात्र भारतीय चाहत्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शुभमन गिलने आता सरावाला सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. शुभमन आज(१२ ऑक्टोबर) रोजी अहमदाबादमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने आज सरावाला सुरुवात केली. शुभमन गिल हा डेंग्यूने बेजार झाला होता. यामुळे त्याला विश्वचषकातील दोन सामन्यांना मुकावं लागलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटर शुभमन गिलची प्रकृती सुधारली आहे. चेन्नईतून अहमदाबादला दाखल झाल्यानंतर गिलने सरावाला सुरुवात केली आहे. शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. या सामन्यासाठी गिलने तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम शुभमन गिलच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे., आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल उतरणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे. गेल्या वर्षभरापासून शुभमन गिल हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गिलची अनुपस्थिती भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरोधात प्रकर्षाने चाणवली. त्यामुळे त्याच्या कमबॅकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात उतरू शकला नाही. त्याच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली होती. पण पहिल्याच सामन्यात ईशान किशन शुन्यावर बाद झाला. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ धावांची खेळी केली. आता शुभमन गिलने सरावाला सुरुवात केल्याने तो पाकिस्तान विरोधात होणाऱ्या सामान्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन