संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

Ind vs NZ, ICC T20 WC26 Final : भारताने सांघिक कामगिरीवर भर द्यावा; अंतिम फेरीसाठी सुनील गावस्कर यांचा सल्ला

भारताने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एखाददुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न राहता, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला.

Swapnil S

मुंबई : भारताने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एखाददुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न राहता, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला. त्याचप्रमाणे आता अंतिम फेरीतही भारताने सांघिक कामगिरीवरच भर द्यावा, असा मोलाचा सल्ला भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

गावस्कर यांच्या 'चॅम्प्स फाऊंडेशनसाठी' आयोजित एका सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेत लिटिल मास्टर सुनील गावस्कर म्हणाले की, "इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताने निसटता विजय मिळवला. माझ्या मते, अंतिम फेरीचा सामना थरारक होणार आहे. न्यूझीलंडने अभूतपूर्व क्रिकेटचे प्रदर्शन केले आहे. भारतीय संघानेही दोन ते तीन सामन्यांत अखेरच्या क्षणी दमदार खेळ करत विजय मिळवला आहे. भारतासाठी ही जमेची बाजू म्हणता येईल."

"भारताने संपूर्ण स्पर्धेत एकाच - खेळाडूवर अवलंबून न राहता, सांघिक कामगिरीनुसार यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन सामन्यांत संजू सॅमसनला दिलेली संधी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे," असेही गावस्कर म्हणाले.

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Nashik : महिंद्राच्या ५,००० कोटींच्या EV प्रकल्पाला भूसंपादनाचा अडथळा; मुख्यमंत्र्यांकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

Pune : सुधारित ‘उडान’ योजनेत महाराष्ट्राला संधी; सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे हवाई मार्गांची निवड

Mira-Bhayandar : गरब्यातील वादाचे पडसाद पोलीस ठाण्यात; आवारातच हाणामारी

Jalgaon : खान्देशातील बोलीभाषांच्या जतनासाठी विद्यापीठात केंद्र; शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार, उदय सामंत यांची घोषणा