क्रीडा

दक्षिण आफ्रिकेविरुध्द आज पहिला वन-डे सामना वर्चस्व राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान

५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची चाचपणी करण्याची नामी संधी भारताला या मालिकेच्या निमित्ताने मिळणार आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी लखनौमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होत आहे. या मालिकेत भारताचे वर्चस्व राखण्याची मोठी जबाबदारी कर्णधार शिखर धवनच्या खांद्यावर आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची चाचपणी करण्याची नामी संधी भारताला या मालिकेच्या निमित्ताने मिळणार आहे.

आशिया चषक २०२२ स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुध्दच्या दोन टी-२० मालिकांमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची चांगली तयारी झाली.

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा टी-२० संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेसाठी निवडलेले खेळाडू हे वेगळे आहेत.

दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी प्रभावी असल्याने वन-डे मालिकेत आणि विशेषत: लखनौच्या सामन्यात भारत केवळ पाच फलंदाज खेळविण्याचा धोका पत्करणार नाही, अशी शक्यता आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सहा फलंदाजांसह उतरण्याची दाट शक्यता आहे. सलामीला शिखर धवन आणि शुभमन गिल जोडी मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येते. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर येण्याची शक्यता आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर मधल्या फळीची धुरा राहील.

संभाव्य प्रतिस्पर्धी संघ

भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, र्इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद, दीपक चाहर, आवेश खान, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.

सामन्याची वेळ

दुपारी १.३० पासून

नाणेफेक : दुपारी १.०० वाजता

ठिकाण: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम, लखनौ

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट‌्स नेटवर्क

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती