क्रीडा

सहा हजार पाचशेपेक्षा जास्त धावा करणारा भारताचा 'हा' खेळाडू ठरला सहावा सलामीवीर

शिखरने २०२० नंतर २३ वन-डे सामने खेळून हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला

वृत्तसंस्था

तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात गुरूवारी झिम्बावेविरुध्द शतक अर्धशतक झळकविणारा शिखर धवन सहा हजार ५०० पेक्षा जास्त धावा करणारा भारताचा सहावा सलामीवीर ठरला. त्याने १५३ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. अशी कामगिरी करून तो सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुलीच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला.

याशिवाय, शिखरने २०२० नंतर २३ वन-डे सामने खेळून हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला. के एल राहुल अशा कामगिरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६ सामन्यांत ७४५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहली असून कोहलीने १६ सामन्यांमध्ये ७३५ धावा केल्या आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस