संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

१५-१५ रुपयांमध्ये पदक विकत घ्या: बजरंग पुनिया

कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक नाकारण्यात आल्यानंतर देशभरातून संपात व्यक्त करण्यात येत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक नाकारण्यात आल्यानंतर देशभरातून संपात व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने विनेशचे अपील फेटाळून लावल्याने विनेशच्या पदरी निराशा पडली. त्यावर आता विनेशचा चांगला मित्र आणि भारताचाच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने खास शैलीत ट्वीट करत नाराजी व्यक्त केली असून विरोधकांना टोलाही लगावला आहे.

“या अंधकारात तुझं पदक जरी हिसकावलं असलं तरी हिऱ्याप्रमाणे साऱ्या जगात तू चमकत आहेस. विश्वविजेत्या भारताची आन-बान-शान असलेली विनेश तू देशाचा कोहिनूर आहेस. संपूर्ण जगात आज तुझ्या नावाचा डंका आहे,” असे बजरंगने म्हटले आहे. तसेच तिच्या यापूर्वीच्या असंख्य पदकांसह असलेला एक फोटो पोस्ट करून बजरंगने, ज्यांना पदक हवे आहे...त्यांनी ते १५-१५ रुपयांमध्ये पदक खरेदी करून न्या...असे लिहिले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दुर्दैवाने अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी ५० ग्रॅम वजन अतिरिक्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तसेच न्यायालयात दाद मागितली. विनेशला पदक देण्यात आले असते, तर भारताची पदकसंख्या सातपर्यंत पोहोचली असती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी