क्रीडा

ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या दोन खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था

भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या चैंवागचा १९-२१, २१-०९, २१-१४ असा पराभव करत मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूचा सामना आता तैवानच्या ताइ यिंग सोबत होणार आहे. सिंधू सोबतच भारताच्या एस. एच. प्रणॉयने देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली.

प्रणॉयने तैवानच्या चौथ्या मानांकित चोऊ चानचा २१-१५, २१-७ असा पराभव केला. थॉमस कप विजयात मोठा वाटा उचलणारा प्रणॉय आता इंडोनेशियाच्या सातव्या सिडेड जॉनतान ख्रिस्टे याच्याशी भिडेल.

पुरूष दुहेरीमध्ये सातवी मानांकित जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा . तसेच माजी राष्ट्रकुल विजेता परूपल्ली कश्यपकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

पियुष गोयल यांच्यासाठी सोपी वाट

फडणवीसांनी टाकला डाव; अभिजित पाटलांची साथ, माढ्यात चक्रे फिरविली

‘क्राऊड पुलर’ नरेंद्र मोदी

भाजपच्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार;महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी!