यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून X
क्रीडा

यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर दुखापतीमुळे बाहेर पडल्याने आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर नुकताच पुनरागमन करत असल्याने यंदाची 'यूएस ओपन' टेनिस स्पर्धा पूर्णपणे खुली झाली आहे.

Swapnil S

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर दुखापतीमुळे बाहेर पडल्याने आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर नुकताच पुनरागमन करत असल्याने यंदाची 'यूएस ओपन' टेनिस स्पर्धा पूर्णपणे खुली झाली आहे.

२४ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या ३९ वर्षीय नोव्हाक जोकोविचलाही वाढत्या वयाचा सामना करावा लागत असून उष्णतेमुळे प्रकृतीचा त्रास होत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी अल्कराझ आणि सिन्नर यांनी पुरुष एकेरीत वर्चस्व गाजवले होते. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिन्नरने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे एप्रिलपासून मैदानाबाहेर असलेला अल्कराझ आपले जेतेपद टिकवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरत आहे. या परिस्थितीमुळे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, डॅनिल मेदवेदेव आणि आर्थर फिल्स यांच्यासारख्या खेळाडूंना विजेतेपद पटकावण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. महिला एकेरीमध्येही दोन वेळेची विजेती आणि अव्वल मानांकित आर्यना सबालेन्का खराब फॉर्मशी झुंजत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शांततेत मतदान; निकाल २७ ऑक्टोबरला

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी