सित्सिपास, मेदवेदेव यांचे आव्हान संपुष्टात; अल्कराझची आगेकूच, अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांमध्ये गतविजेती सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत (Photo-X)
क्रीडा

सित्सिपास, मेदवेदेव यांचे आव्हान संपुष्टात; अल्कराझची आगेकूच, अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांमध्ये गतविजेती सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत

ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपास, रशियाचा डॅनिल मेदवेदेव यांना सोमवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

Swapnil S

न्यूयॉर्क : ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपास, रशियाचा डॅनिल मेदवेदेव यांना सोमवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. स्पेनच्या गतविजेत्या कार्लोस अल्कराझने मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांमध्येही गतविजेत्या बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पुरुष एकेरीच्या सामन्यात गेल माँफिल्सने अडॉल्फो डॅनिएल व्हॅलेजोचा २-६, ६-१, ६-२, ६-० असा पराभव केला. या विजयासह तो यूएस ओपनच्या इतिहासात सामना जिंकणारा जिमी कॉनर्सनंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. कॉनर्सने २ सप्टेंबर १९९२ रोजी आपल्या ४० व्या वाढदिवशी जेम ऑनसिन्सचा पराभव केला होता.

अमेरिकन ओपन या वर्षातील चौथ्या व अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीला गेल्या रविवारपासून प्रारंभ झाला. यंदा या स्पर्धेचे १४६वे वर्ष सुरू आहे. २०२५मध्ये स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले होते. पुरुषांमध्ये इटलीच्या यॅनिक सिनरच्या अनुपस्थितीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला, तर महिलांमध्ये सबालेंकाला अग्रमानांकन प्राप्त झाले आहे.

दरम्यान, पहिला सेट २-६ असा गमावल्यानंतर माँफिल्सने जोरदार पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये १-० अशी आघाडी असताना त्याने हवेत उडी मारून मारलेला फोरहँड शॉट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यानंतर लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून त्याला दाद दिली आणि त्याच्यासाठी वाढदिवसाचे गाणे गायले. “माझ्या ४०व्या वाढदिवशी खेळणे आणि विजय मिळवणे हा अतिशय खास अनुभव आहे,” अशी प्रतिक्रिया माँफिल्सने दिली.

या वर्षाच्या शेवटी निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेल्या माँफिल्सने यापूर्वी २०१६ मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यंदाच्या स्पर्धेत त्याने आपली पत्नी एलिना स्वितोलिना हिच्यासोबत मिश्र दुहेरीत सहभागी होत उपांत्य फेरी गाठली आहे. २०२५ च्या विम्बल्डनच्या पहिल्या फेरीनंतरचा त्याचा हा पहिलाच ग्रँड स्लॅम विजय ठरला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

लाऊडस्पीकर लावा, पण नियमांचे पालन करा! समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन, बाप्पाच्या उंचीबाबत तज्ज्ञांची नियुक्ती करावी

Mumbai : आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणावर बुलडोझर; अंधेरीत गॅरेज आणि मंगल कार्यालय जमीनदोस्त

AI करणार मेंदूच्या आजाराचे वेळीच निदान; KEM रुग्णालयात प्रथम १५० रुग्णांची तपासणी; BMC च्या सर्वच रुग्णालयांत लवकरच विस्तार

Mumbai : शालेय साहित्यावरून खडाजंगी; १ जूनपूर्वी विद्यार्थ्यांना संपूर्ण साहित्य देणार, पालिका प्रशासनाचे सभागृहात आश्वासन