वैभव सूर्यवंशीला नैसर्गिक खेळ करू द्या! सनथ जयसूर्याच्या हस्ते दोन जर्सीचे अनावरण 
क्रीडा

वैभव सूर्यवंशीला नैसर्गिक खेळ करू द्या! सनथ जयसूर्याच्या हस्ते दोन जर्सीचे अनावरण

भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळण्याची मुभा दिली पाहिजे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, तो भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक ठरेल, असे मत श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळण्याची मुभा दिली पाहिजे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, तो भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक ठरेल, असे मत श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने व्यक्त केले.

मुंबई रॉयल्स आणि महाराष्ट्र सुपर स्ट्रायकर्स या इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगमधील संघांच्या जर्सी अनावरण कार्यक्रमावेळी तो बोलत होता. जयसूर्या म्हणाला, "वैभवला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र, तो भारताच्या भविष्यासाठी एक चांगला खेळाडू आहे. त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळू द्या आणि त्याचे काम करू द्या. भारतीय क्रिकेटसाठी ही एक चांगली गुंतवणूक ठरेल."

भारताचा आणखी एक युवा फलंदाज अभिषेक शर्मा याचेही जयसूर्याने कौतुक केले. "भारतात अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत आणि ते चांगली कामगिरी करत आहेत. अभिषेकही सध्या उत्तम क्रिकेट खेळत आहे. अनेक भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्यात गुणवत्ता आहे."

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार