@mufaddal_vohra
क्रीडा

IND vs PAK : कोहलीचे 'विराट' रूप! 'अशी' कामगिरी करणारा विश्वातील तिसराच फलंदाज, बघा शतकी खेळीतील खास आकडे

IND vs PAK, Champions Trophy 2025: भारताला जिंकण्यासाठी २ धावांची, तर स्वत:च्या शतकासाठी ४ धावांची गरज असताना विराट कोहली(१११ चेंडूंत नाबाद १००)ने पाकिस्तानच्या खुशदील शाहच्या ४३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावून थाटात भारताच्या विजयासह शतकावर शिक्कामोर्तब केले.

Krantee V. Kale

भारताला जिंकण्यासाठी २ धावांची, तर स्वत:च्या शतकासाठी ४ धावांची गरज असताना विराट कोहली(१११ चेंडूंत नाबाद १००)ने पाकिस्तानच्या खुशदील शाहच्या ४३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावून थाटात भारताच्या विजयासह शतकावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच, दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या हायहोल्टेज लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ गडी आणि ४५ चेंडू राखून धुव्वा उडवला. या सामन्यात कोहलीने ५१व्या एकदिवसीय शतक झळकावलेच, त्याशिवाय एकदिवसीय कारकीर्दीतील १४ हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो विश्वातील तिसराच फलंदाज ठरला. तसेच, एकदिवसीय प्रकारात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीतही अग्रस्थान गाठले. - बघा विराटच्या शतकी खेळीदरम्यानचे खास आकडे

विश्वातील तिसराच फलंदाज : विराटने रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील १४ हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो विश्वातील तिसराच फलंदाज ठरला. मात्र विराटने सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्या तुलनेत सर्वात कमी डावांत म्हणजेच २८७ इनिंग्जमध्ये ही कामगिरी केली. सचिनने यासाठी ३५०, तर संगकाराने ३७८ डाव घेतले होते.

-सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही तिसरा : आता एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट तिसऱ्या स्थानी आहे. सचिन १८,४२६ धावांसह पहिल्या, तर संगकारा १४,२३४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

-आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ८२ शतके

विराटला एकदिवसीय कारकीर्दीतील ५१वे शतक झळकावले. नोव्हेंबर २०२३नंतर त्याचे हे या प्रकारातील तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिलेच शतक ठरले. विराटची आता आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ८२ शतके झाली आहेत.

-सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीतही अग्रस्थान

विराटने एकदिवसीय प्रकारात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवले. विराटचे सध्या १५८ झेल आहेत. त्याने मोहम्मद अझरुद्दीनच्या १५६ झेलच्या विक्रमास मागे टाकले. आता सर्वाधिक झेल घेणाऱ्या विश्वभरातील खेळाडूंच्या यादीत विराट एकंदर तिसऱ्या स्थानी आहे. महेला जयवर्धने २१८, तर रिकी पाँटिंग १६० झेलसह विराटपुढे आहेत.

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

"हॉटेलमध्ये बोलवत होता..."; अभिनेत्रीचे नेत्यावर गंभीर आरोप, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानंतर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा; म्हणाला, ''तिने माझे नाव...

ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-"मला...

राज ठाकरे अचानक 'वर्षा'वर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट; म्हणाले, ''आपण कबुतर, हत्ती यात अडकलो, पण...''