यष्टिरक्षणाची गरज काय? यशस्वीने फलंदाजीवर लक्ष द्यावे; जाफरचा सल्ला X
क्रीडा

यष्टिरक्षणाची गरज काय? यशस्वीने फलंदाजीवर लक्ष द्यावे; जाफरचा सल्ला

भारताचा कसोटीपटू यशस्वी जैस्वालने वयाच्या २४व्या वर्षी यष्टीरक्षणाची भूमिका स्वीकारण्याच्या निर्णयावर भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबईचे फलंदाजीचे मानकरी वसीम जाफर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा कसोटीपटू यशस्वी जैस्वालने वयाच्या २४व्या वर्षी यष्टीरक्षणाची भूमिका स्वीकारण्याच्या निर्णयावर भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबईचे फलंदाजीचे मानकरी वसीम जाफर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जैस्वालने यष्टीरक्षणाऐवजी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. रणजी स्पर्धेपूर्वी जैस्वालने फलंदाजी आणि लेगस्पिनसोबतच यष्टीरक्षणाचा सराव केल्याचे मुंबईचे कर्णधार सिद्धेश लाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर जैस्वालने सरावादरम्यान काही षटके यष्टीरक्षणही केल्याचे समोर आले होते.

या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करताना वसीम जाफर यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “लहानपणापासून यष्टीरक्षण केले नसेल तर ही भूमिका पार पाडणे अत्यंत अवघड असते. कसोटी क्रिकेटमध्ये हे काम अत्यंत आव्हानात्मक असून योग्य पायाशिवाय यात जुळवून घेणे कठीण जाईल.” संघात आधीपासूनच ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन यांसारखे तज्ज्ञ यष्टीरक्षक उपलब्ध असताना जैस्वालने या क्षेत्रात उतरण्याचा विचार करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मर्यादित षटकांच्या संघात स्थान मिळवण्यासाठी जैस्वाल घाई करत असल्याचे दिसत असून, आगामी न्यूझीलंड दौरा आणि रणजी करंडक स्पर्धेच्या दृष्टीने त्याने केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला जाफर यांनी दिला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गरबा, दांडिया सुरक्षेवर पोलिसांचे विशेष लक्ष; मंडळांपासून मैदानांपर्यंत वाढता पहारा, महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य

Mira-Bhayandar : पोलिसांनी थकविली ११ कोटींची थकबाकी; जप्त वाहने ठेवण्यासाठी दिली होती जागा

Palghar : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड

Raigad : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय; पतीला अटक, चौघांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai : २५० कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी! पैसे भरूनही वर्षभरापासून घरांचा ताबा मिळत नसल्याने खरेदीदार त्रस्त