विम्बल्डन टेनिस स्पर्धा : चर्चा ओसाकाच्या फॅशनची अन् बेकहॅमची X
क्रीडा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : चर्चा ओसाकाच्या फॅशनची अन् बेकहॅमची

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो जपानची खेळाडू नाओमी ओसाकाच्या फॅशनने आणि रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने. यावेळी अग्रमानांकित सिनरने विजयारंभ केला. मात्र त्याला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला. बेकहॅमची आई सिंड्रादेखील यावेळी सेंटर कोर्टवर उपस्थित होती.

Swapnil S

लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो जपानची खेळाडू नाओमी ओसाकाच्या फॅशनने आणि रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने. यावेळी अग्रमानांकित सिनरने विजयारंभ केला. मात्र त्याला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला. बेकहॅमची आई सिंड्रादेखील यावेळी सेंटर कोर्टवर उपस्थित होती.

पांढऱ्या रंगाच्या कपड्यांच्या कडक नियमांनंतरही ओसाका हिने सोमवारी ऑल इंग्लंड क्लबच्या मैदानावर आपल्या फॅशनची जादू दाखवली. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये आपल्या कल्पक कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या ओसाकाने एल्सा जॅकइमोटविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी कोर्ट क्रमांक तीनवर प्रवेश केला, तेव्हा तिने किमोनोसारखा वाहता रोब परिधान केला होता. या कपड्याला लटकणारे हात आणि त्यावर उत्कृष्ट भरतकाम करण्यात आले होते. ओसाकाच्या या नव्या फॅशनला उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. ती कोर्टवर येत असताना एका महिला चाहतीने कम ऑन क्वीन म्हणत तिचे मनोबल वाढवले.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल