आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय महिला संघाचा विजयारंभ X / @sportstarweb
क्रीडा

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय महिला संघाचा विजयारंभ

गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेतेपदाच्या बचावाची सुरुवात दणक्यात केली.

Swapnil S

भोपाळ : गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेतेपदाच्या बचावाची सुरुवात दणक्यात केली. मलेशियाने सुरुवातीला आघाडी घेत भारताला धक्का दिला; मात्र भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत ४-१ असा शानदार विजय मिळवला. भोपाळ येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, नाथू बरखेडा येथे गुरुवारी हा सामना झाला.

भारताकडून मुमताज खान (२०वे मिनिट), कर्णधार सलीमा टेटे (३५वे मिनिट), पदार्पण करणारी पूजा साहू (३९वे मिनिट) आणि लालरेमसियामी (४९वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. मलेशियाकडून नुरामिराह झुल्किफ्ली हिने १९व्या मिनिटाला गोल केला.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मलेशियाने आक्रमक सुरुवात केली. १९व्या मिनिटाला नुरामिराह झुल्किफ्लीने मैदानी गोल करत मलेशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही. अवघ्या एका मिनिटात मुमताज खानने गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे मध्यंतराला दोन्ही संघांची बरोबरी होती.

मध्यंतरानंतर भारतीय संघाने आक्रमणाची तीव्रता वाढवली. ३५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरनंतर गोलक्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा घेत कर्णधार सलीमा टेटेने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. या गोलमुळे भारताने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांत भारताने आणखी एक गोल केला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या पूजा साहूने ३९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर अचूक फटका मारत भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली.

भारताचा आक्रमक खेळ चौथ्या सत्रातही कायम राहिला. ४९व्या मिनिटाला लालरेमसियामीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी ४-१ अशी केली. त्यानंतर भारतीय बचावफळीने मलेशियाला पुनरागमनाची संधी दिली नाही. भारताकडून पदार्पण करणाऱ्या पूजा साहूने गोल नोंदवण्याबरोबरच प्रभावी कामगिरी केली. तिच्या या कामगिरीची दखल घेत तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा