ठाणे

पत्रकाराच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

भाजपचा पदाधिकारी असलेल्या संजय ठाकूरने स्वतःला पत्रकार सांगून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास धमकी देत खंडणी उकळल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या गीतेश दवे नावाच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

भाईंंदर : भाजपचा पदाधिकारी असलेल्या संजय ठाकूरने स्वतःला पत्रकार सांगून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास धमकी देत खंडणी उकळल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या गीतेश दवे नावाच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली, गणेश देवल नगर भागात दिनेश गौतम हा बांधकाम कंत्राटदार एका बांधकामाचे काम मिळाल्याने ते करत होता. जानेवारी महिन्यात गौतम हा बांधकाम करत असताना स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या भाजप पदाधिकारी संजय ठाकूरने त्याला कॉल करून महापालिकेकडे तक्रार करून बांधकाम तोडण्याची धमकी दिली.

याप्रकरणी नगर भवनजवळ गौतमला बोलावून ठाकूरने त्याच्याकडे ५ हजारांची खंडणी उकळली. २८ एप्रिल रोजी संजयने गौतमकडून आणखी ६ हजार रुपयांची खंडणी वसूल केली. या खंडणी वसुलीत त्याच्यासोबत गितेश दवे हा देखील होता.

या प्रकरणी गौतम यांच्या तक्रारीनंतर ३ मे च्या रात्री भाईंदर पोलिसांनी संजय व दवे या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक निरीक्षक माणिक कतुरे हे तपास करत आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक