ठाणे

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची वानवा; गोरगरीब रुग्णांचे हाल

गेल्या काही दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा असल्याचे पहावयास मिळत आहे. एकतर डॉक्टरांची कमतरता त्यात औषधांचा तुटवडा यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे.

Swapnil S

उरण : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची वानवा पाहायला मिळत आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे येथील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे.

गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शासनाने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. गोरगरीबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये व त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावा म्हणून आरोग्य विभागाकडून ४०० पेक्षा अधिक प्रकारच्या गोळ्या व औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवला जातो. मात्र, उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक प्रकारच्या गोळ्या, औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या, औषधांचा वापर रुग्णांसाठी केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा असल्याचे पहावयास मिळत आहे. एकतर डॉक्टरांची कमतरता त्यात औषधांचा तुटवडा यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. सध्या औषध उपलब्ध नाहीत, नंतर येतील त्यामुळे बाहेरून औषधे विकत घ्या असे आरोग्य केंद्रातील कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असणाऱ्या भोंगळ कारभारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था रोज मेरे त्याला कोण रडे अशी झाली असेल तर गोरगरीबांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सदर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या माध्यमातून गोळ्या लिहून दिल्या जातात मात्र औषध घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गेल्यानंतर औषध देणारे कर्मचारी या गोळ्या बाहेरून घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमेवरील औषधे, टीबी, बीपीवरील देखील गोळ्या उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दहा गोळ्या लिहून दिल्या असता आरोग्य केंद्रातील औषध देणारे कर्मचारी फक्त चारच गोळ्या देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेकदा औषध असून देखील नाही असल्याचे देखील हे कर्मचारी सांगत असल्याचे निदर्शनास येत आहे.

- मीना रामभाऊ पाटील, (रहिवासी)

आमच्याकडून औषध पुरवठा व्यवस्थित केला गेला आहे. मात्र जर तशी काही परिस्थिती असेल तर त्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल.

- डॉ मनीषा विखे, (कम्युनिटी मेडिसिन जिल्हा आरोग्य अधिकारी)

राज्य धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; राज्यात कायदा लागू, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतचा कारावास

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज

Mumbai : दादरमध्ये चेंबरची संरक्षक ग्रील लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल