ठाणे

हवा प्रदूषण रोखण्याबाबत १८२ ठिकाणी कारवाई; ९ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल; १२० बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार, महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण ३१७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी १८२ ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नियमांच्या पूर्ततेसोबतच ०९ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या १२० बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये? यासाठी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्यापैकी ज्यांनी नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल दिला आहे, त्याची पडताळणी केली जात आहे.

नोटीस बजावण्यात आलेल्या सात विकासकांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली आहे. सर्व बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

यांना बांधकाम थांबविण्याची नोटीस

मौजे नौपाडा येथील मे. स्कायलाइन इन्फ्रा, मौजै ठाणे येथील सुयश पाटणकर, मौजे माजिवडे येथील मे. अष्टविनायक एंटरप्रायझेस, सेवा रस्ता येथील मे. पद्मनाभ डेव्हल्पर्स, मौजे पारसिक येथील मे. सरस्वती एंटरप्रायझेस, मौजे पारसिक येथील मे. जय प्रॉपर्टीज, मौजे कळवा येथील मे. सिद्धीविनायक डेव्हल्पर्स यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे.

काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केल्याचे निवेदन शहर विकास विभागास प्राप्त झाले आहे. त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच, यापुढेही कोणाकडून नियमावलीचे पालन न झाल्यास अशाप्रकारे कारवाई करण्यात येईल.

- संग्राम कानडे, सहाय्यक संचालक नगररचना

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती