सात वर्षांनंतर माथेरानमध्ये युतीचा विजय; नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी  
ठाणे

सात वर्षांनंतर माथेरानमध्ये युतीचा विजय; नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या माथेरान नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक फेरीत प्रचंड चुरस पाहायला मिळत होती. अखेर नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांनी तब्बल १,०६९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले.

Swapnil S

चंद्रकांत सुतार/माथेरान

यंदाची निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली होती. शिवसेना-भाजप युतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. दुसरीकडे सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवराष्ट्र पॅनल’ उभे करण्यात आले होते, ज्यामुळे या निवडणुकीला मोठे राजकीय आव्हान निर्माण झाले होते. दोन्ही पॅनेलमधील तीव्र चुरशीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले होते. निकालाने मात्र सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत शिवसेना-भाजप युतीने नगरपरिषदेत एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रभागनिहाय ताकद आजमावत शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी बहुसंख्य जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. विशेषतः प्रभाग क्रमांक ९ आणि १० या निवडणुकीत केंद्रस्थानी राहिले होते. सुनील शिंदे आणि किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेच्या उमेदवारांनी या प्रभागांमध्ये विजय मिळवत युतीला निर्णायक बहुमत मिळवून दिले. या प्रभागांच्या निकालामुळे नगरपरिषदेत सत्तेची घडी मजबूत झाली.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल