ठाणे

वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा ठाकरे गटाकडून निषेध

Swapnil S

कल्याण : पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याच्या कल्याण मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला. सोमवारी कल्याणमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी पत्रकार परिषद घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनेच्या कांचन खरे, प्रथमेश पुण्यार्थी आदी पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

५०० वर्षांनी युग पुरुष जन्मला ते म्हणजे नरेंद्र मोदी अशा शब्दात खासदारांनी संसदेत नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. या वक्तव्याचे पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहेत. कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी खासदार शिंदे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

बाळ हरदास यांनी संसदेत जर मुख्यमंत्र्यांचा मुलगाच पाचशे वर्षांत मोदींसारखे कुणी जन्मला नाही असे बोलत असेल तर या पाचशे वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मलेच नाही का? असा सवाल केला. ज्या बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे चालतात असं ते बोलतात त्या बाळासाहेबांचा जन्म या पाचशे वर्षांत नाही झाला का? असा सवाल केला. पुढे बोलताना खासदार शिंदे यांच्या विरोधात भाजप आणि आरएसएस नाराज आहे. त्यामुळे येथे लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांना भाजप-आरएसएस मतदान करणार नाही. त्या भीतीने ते मोदींची स्तुती करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मोदींप्रमाणे फडणवीसही विरोधकांना कुत्र्याची उपमा देतात. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला.

ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांची हत्या, पुण्यात शरद मोहोळची हत्या, तसेच इतर अनेक ठिकाणी गोळीबारच्या घटना घडत असल्याने गुन्हेगार, खुनी, खंडणीखोरांची पाठराखण करणारं सरकार असल्याची टीका बाळ हरदास यांनी केली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त