प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

बदलापूर स्थानकावर प्रवाशांसाठी मोठा बदल; कर्जत लोकलचा थांबा तीन डबे मागे

बदलापूर रेल्वे स्थानक येथे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचा थांबा तीन डबे मागे करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांनी योग्य ठिकाणी उभे राहून लोकल पकडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानक येथे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचा थांबा तीन डबे मागे करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांनी योग्य ठिकाणी उभे राहून लोकल पकडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेड उभारणीच्या कामाला अखेर सुरुवात होत आहे. त्यामुळे कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या आता तीन डबे मागे थांबणार आहेत. हे काम एमआरव्हीसी यांच्या माध्यमातून राबवले जात असून, कर्जत बाजूकडील फूटओव्हर ब्रिजपासून प्लॅटफॉर्मवरील डेकपर्यंत शेड उभारण्यात येणार आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी शेड उभारणीचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

निवासी जागा : व्यावसायिक वापर केल्यास जागा सील; सुप्रीम कोर्टाचे आदेश

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली