ठाणे

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण ओव्हरफ्लो

भिवंडी - निजामपूर या महापालिकांसह औद्योगिक विभाग व अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील काही भागाला पाणीपुरवठा केला जातो

प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर भरून वाहू लागते आहे. गुरुवारी संध्याकाळी बारवी धरण ३४० दशलक्ष घनमीटर पाणी पातळी गाठून वाहू लागले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी - निजामपूर या महापालिकांसह औद्योगिक विभाग व अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण जिल्ह्यासाठी महत्वाचा जलस्त्रोत आहे. दरवर्षी साधारणतः जुलै महिन्यात बारवी धरण ओव्हरफ्लो होत असते. मागील वर्षीही जुलै अखेरीस बारवी धरण ओव्हरफ्लो झाले होते. परंतु यंदा मे महिन्याच्या अखेरीस बारवी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यात यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचा मात्र जोर वाढला.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी