प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित; शहरातील २१ टक्के मतदान केंद्र संवेदनशील, पोलिसांनी विशेष खबरदारी वाढवली

संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीमध्ये ७१८ मतदान केंद्रांपैकी १५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ही संख्या सर्वसाधारण केंद्रांच्या तुलनेत २१ टक्के आहे.

Swapnil S

भिवंडी : संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीमध्ये ७१८ मतदान केंद्रांपैकी १५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ही संख्या सर्वसाधारण केंद्रांच्या तुलनेत २१ टक्के आहे. यामध्ये शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५८ केंद्रे सर्वाधिक संवेदनशील म्हणून गणली गेली आहेत. भिवंडीत निवडणूक कार्यकाळात अनेक हाणामारी, दमदाटी आणि दहशत पसरविण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत असतात. यामुळे शहरातील काही मतदान केंद्र इमारती, मतदान केंद्र संवेदनशील मानली जातात.

१५३ मतदान केंद्र संवेदनशील

शहरातील एकूण १७३ मतदान केंद्र इमारतीमध्ये ७१८ मतदान केंद्रांचे मतदान होणार आहे. यापैकी १४६ इमारतीतील ५६५ मतदान केंद्र सर्वसाधारण, २७ इमारतीतील १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. संवेदनशील केंद्रांमध्ये आयटीआय इमारत, ईदगाह, हंडी कंपाऊंड, आजमी नगर, टावरे कंपाऊंड, समद नगर, नवी बस्ती, प्रभाग क्रमांक ३ इमारत, शास्त्रीनगर, भाग्यनगर, संगम पाडा, कोंबडपाडा, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, भंडारी कंपाऊंड यांचा समावेश आहे.

US-Iran Ceasefire: इराणसोबतचा शस्त्रसंधीचा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्याची ट्रम्प यांची घोषणा; आर्थिक नाकेबंदी मात्र कायम

सरकारचे तंत्रकठोर नियम! एआयसाठी ‘कायमस्वरूपी’ लेबल; ऑनलाइन गेमिंगसाठीही नवीन नियमावली जाहीर

Mumbai : राणीबागेत लवकरच सिंह गर्जना घुमणार; महापौर गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणी करणार

बँकांच्या 'दादागिरी'ला सिद्धार्थ जाजूंचे आव्हान; ५५ कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा ठोकणार

कापूरबावडी ते दुर्गाडी मेट्रो मार्गास मंजुरी; कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता