Bhiwandi : पैसे उकळणारी तोतया महिला जेरबंद 
ठाणे

Bhiwandi : पैसे उकळणारी तोतया महिला जेरबंद

अन्न व औषध प्रशासन विभागाची अधिकारी असल्याचे भासवून शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि घाऊक विक्रेत्यांना धमकावत पैसे उकळणाऱ्या एका तोतया महिला अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Swapnil S

भिवंडी : अन्न व औषध प्रशासन विभागाची अधिकारी असल्याचे भासवून शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि घाऊक विक्रेत्यांना धमकावत पैसे उकळणाऱ्या एका तोतया महिला अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शांताबाई दशरथ राजपूत असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीतील अन्य दोन महिला आणि एक पुरुष आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर प्लाझा हॉटेल परिसरातील एका घाऊक दुकानात आरोपी महिला तिच्या साथीदारांसह आली होती. त्यांनी स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत दुकानदारांवर शिळे अन्नपदार्थ व मुदतबाह्य साहित्य विक्री केल्याचा आरोप केला.

त्यानंतर कारवाईची भीती दाखवून दुकानदारांकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

पीडित दुकानदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित टोळीविरुद्ध खंडणी उकळणे, तोतया अधिकारी बनून फसवणूक करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फरार झालेल्या अन्य तीन आरोपींचा शोध सुरू असून या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

'लायन'ची सहा दशकांनी भारतात वापसी; प्रीमियम बिअरसह ब्रिटिश बीअर उत्पादकाचा दिल्लीच्या बाजारात प्रवेश

Jalgoan : सातपुडा जंगल सफारीची वर्षपूर्ती; पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, स्थानिकांना रोजगाराची संधी

युरियाचा ८८ लाखांचा काळाबाजार उघडकीस; खताच्या ७२८ गोण्या जप्त, लासलगाव पोलिसांची मोठी कामगिरी