भिवंडीत फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर; अन्न विषबाधाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर; महापालिकेने केली कारवाई 
ठाणे

भिवंडीत फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर; अन्न विषबाधाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर; महापालिकेने केली कारवाई

भिवंडीत चिकन शोरमा व पिझ्झा खाल्ल्याने अन्न विषबाधा झालेल्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. महापौर नारायण चौधरी व आमदार महेश चौघुले यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणास कारणीभूत ठरलेल्या 'फेमस शोरमा' हॉटेलवर महापालिकेने बुलडोझर कारवाई करत ते पाडले.

Swapnil S

भिवंडी : भिवंडीत चिकन शोरमा, पिझ्झा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी सकाळी १०७ वर पोहचली असून शनिवारी दुपारी महापौर नारायण चौधरी व आमदार महेश चौघुले यांनी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस करीत वैद्यकीय पथका कडून केल्या जात असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासात या अन्न विषबाधा प्रकरणी कारणीभूत ठरलेल्या फेमस शोरमा या हॉटेलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त केले आहे.

अन्न विषबाधेची घटना अत्यंत असून स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी दुर्दैवी खेळण्याचा हा प्रकार आहे. सुदैवाने कोणाचा जीव गेला नाही. नागरिकांनी घरातील अन्न खावे असा सल्ला देत हॉटेल चालकाकडे कोणताही परवाना नसल्याची बाब समोर आल्याने त्यावर कारवाई करण्याचे तत्काळ निर्देश दिले आहे.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस