Bhiwandi : अतिरिक्त फी मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह तिघी ACB च्या जाळ्यात 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Bhiwandi : अतिरिक्त फी मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह तिघी ACB च्या जाळ्यात

भिवंडीतील एका अनुदानित उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली अतिरिक्त फी मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह तीन महिलांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे.

Swapnil S

भिवंडी : भिवंडीतील एका अनुदानित उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली अतिरिक्त फी मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह तीन महिलांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अतिया बैदुझमान खान (मुख्याध्यापिका), रिजवाना बानू अमजद खान (खासगी कॉम्प्युटर शिक्षिका) आणि अस्मा मोहशफी शेख (खासगी लिपिक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सलाउद्दीन अयुबी मेमोरियल हायस्कूल या उर्दू माध्यमाच्या शासकीय अनुदानित शाळेत तक्रारदार अबुलैस अन्सारी हे आपल्या मुलीच्या इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी ७ मे रोजी गेले होते. त्यावेळी शाळा प्रशासनाने ५ हजार रुपये देणगी व फी म्हणून मागणी केली.

शाळा अनुदानित असतानाही अतिरिक्त रक्कम मागितली जात असल्याने तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तांत्रिक पडताळणी करून ११ मे रोजी सापळा रचला.

या कारवाईदरम्यान, विद्यार्थिनीच्या प्रवेशावेळी ४ हजार रुपये स्वीकारताना तिन्ही आरोपी महिलांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ मे रोजी आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...