ठाणे

Bhiwandi : नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या तरुणाला कंटेनरची धडक, चाकाखाली चिरडून मृत्यू; चालक फरार

Swapnil S

भिवंडी : नैसर्गिक विधीसाठी पायी चालत जाणाऱ्या तरुणास कंटेनरने जोरदार धडक दिली असता झालेल्या अपघातात तरुणाचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील कोपरमधून समोर आली आहे. याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रमेश जयस्वाल (२९) असे अपघातात दुर्दैवी मयत पावलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१३ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोपर येथील वेताळ मंदिराजवळील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या गेटजवळून मयत रोहित नैसर्गिक विधीला जाण्यासाठी पायी चालत निघाला होता. त्यावेळी कंटेनरचालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत रोहितला जोरात धडक दिली. या धडकेत तो कंटेनरच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला. यामुळे अतिरक्तस्त्रावाने त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे. या प्रकरणी कंटेनरचालक फरार असून मयत रोहितचे वडील सुरेश जयस्वाल यांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि विकास राऊत करीत आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस