ठाणे

Thane : लाचप्रकरणी उपायुक्तांसह तिघांना कोठडी; बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी

अनधिकृत तीन दुकानांचे गाळे हटविण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे, खाजगी इसम ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांना ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी सोमवारी न्यायालयीन (जेल) कोठडी सुनावली.

Swapnil S

ठाणे : अनधिकृत तीन दुकानांचे गाळे हटविण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे, खाजगी इसम ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांना ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी सोमवारी न्यायालयीन (जेल) कोठडी सुनावली.

दरम्यान, या तिघांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे. नौपाड्यातील तीन दुकानांचे गाळे हटविण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून २५ लाखांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पाटोळे आणि गायकर यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांना सुरुवातीला दोनदा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. दरम्यान, सुशांत सुर्वेला अटक करून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी या तिघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना एकत्रच ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे यांनी सरकारी बाजू मांडली, तर पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी बाजू मांडली.

बुधवारी जामीनावर सुनावणी

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिघांच्या वकिलांनी जामीन मिळावा यासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायाधीश शिंदे यांनी या अर्जावर सुनावणी येत्या बुधवारी (ता. ८) होईल, असे स्पष्ट केले. यावेळी पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी मंगळवारीच सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती; मात्र न्यायालयाने बुधवारी सुनावणी होणार असल्याचे ठाम सांगितले.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय