Thane : तानसा नदीत सख्ख्या भावांचा अंत 
ठाणे

Thane : तानसा नदीत सख्ख्या भावांचा अंत

गणेशपुरी परिसरातील प्रसिद्ध अकलोली गरम पाण्याच्या कुंडाजवळ तानसा नदीत बुडून विरार येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रतिनिधी

दानिश आझमी/भिवंडी : गणेशपुरी परिसरातील प्रसिद्ध अकलोली गरम पाण्याच्या कुंडाजवळ तानसा नदीत बुडून विरार येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरुण राम बच्चन चौहान (१३) आणि त्याचा धाकटा भाऊ आयुष राम बच्चन चौहान (१०) अशी आहेत. विरार येथे रिक्षाचालक असलेले त्यांचे वडील राम बच्चन चौहान हे पत्नी, दोन मुलगे आणि एका लहान मुलीसह प्रसिद्ध अककोली येथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी आले होते. त्यानंतर हे कुटुंब तानसा नदीच्या जवळच्या किनाऱ्यावर गेले. यावेळी दोन्ही भाऊ नदीत उतरले. पाण्यात आंघोळ करताना ते नदीच्या अधिक खोल भागाकडे गेले.

पोलीस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, नदीला यावेळी जोरदार प्रवाह असून पाण्याची खोलीही मोठी होती. दोन्ही मुलांचा पाण्यात तोल गेल्याने ते बुडू लागले.

स्थानिक तरुणांनी तत्काळ नदीत उतरून शोधमोहीम सुरू केली. सुमारे तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही भावांना त्यांनी नदीतून बाहेर काढले. ते ज्या ठिकाणी नदीत उतरले होते, त्यापासून काही अंतरावर दोघांचे मृतदेह आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका