मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

आसनगाव-कसारा तिसरा मार्ग आणि कसारा यार्डातील अप यार्ड मार्गाच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून कसारा येथे ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवस विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : आसनगाव-कसारा तिसरा मार्ग आणि कसारा यार्डातील अप यार्ड मार्गाच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून कसारा येथे ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवस विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ वाजेपर्यंत, तर ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारा दरम्यानच्या अप-डाऊन मुख्य मार्गावर तसेच कसारा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १, ३, ४ आणि अप यार्डमध्ये हे काम करण्यात येईल.

७ व ८ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी-कसारा लोकलमधील १३.१०, १४.१७, १४.४६ आणि १६.५० वाजताच्या गाड्या आसनगावपर्यंतच धावतील. कसारा-सीएसएमटीच्या १५.३५, १६.१६, १७.०२ आणि १८.१७ वाजताच्या लोकल आसनगावहून अनुक्रमे १६.१२, १६.५४, १७.३९ आणि १८.५४ वाजता सुटतील.

७ व ८ ऑक्टोबर रोजी ब्लॉकपूर्वी कसारासाठी सीएसएमटीहून शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता, तर कसारा-सीएसएमटी शेवटची लोकल दुपारी १४.४२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर कसारासाठी पहिली लोकल सीएसएमटीहून १८.२८ वाजता, तर सीएसएमटीसाठी कसाराहून पहिली लोकल २०.३५ वाजता सुटणार आहे.

८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सीएसएमटी-कसारा २२.४७ वाजताची व ९ ऑक्टोबरला ००.०८ वाजताची लोकल, टिटवाळा-ठाणे २३.१४ वाजताची आणि कसारा-सीएसएमटी ०३.५१ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे.

काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. एलटीटी-बनारस एक्स्प्रेस, एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा रवाना होतील.

गाड्यांना अतिरिक्त विलंब होण्याची शक्यता

गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, अयोध्या कॅन्ट-एलटीटी एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस आणि जननेश्वरी एक्स्प्रेससह काही गाड्या इगतपुरी येथे नियंत्रित करण्यात येणार आहेत. दादर-गोरखपूर एक्स्प्रेसला खर्डी येथे एक तास, तर एलटीटी-राजगीर एक्स्प्रेसला अटगाव येथे ३० मिनिटे थांबविण्यात येणार आहे. भुसावळ विभागातही काही गाड्यांना ३० मिनिटांपासून १ तास २५ मिनिटांपर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे. ब्लॉकमुळे गाड्यांचे नियमन आणि एकत्रित वाहतूक झाल्याने काही गाड्यांच्या वेळेत अतिरिक्त विलंब होऊ शकतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

दुष्काळ आवडे 'टँकर लॉबी'ला; नोंदणी वाढल्याने निर्मिती उद्योगाला तेजी

देशभरातून मान्सूनचा १० ऑक्टोबरपर्यंत निरोप

२०२७च्या वनडे विश्वचषकासाठी भारत, पाकिस्तान पुन्हा एकाच गटात; २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यानच्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर