(संग्रहित छायाचित्र)
ठाणे

शाळांसह श्री स्वामी समर्थ बैठकींच्या वेळांतही बदल, उष्माघातामुळे निर्णय

उष्माघात टाळण्यासाठी संबंधितांनी घेतलेल्या या निर्णयाचे महिला वर्ग व विद्यार्थ्यांमधून स्वागत होत असून याप्रमाणेच अन्य नोकरदार, कामगार, मजूर, चाकरमानी वर्गातून अशाच प्रकारे वेळेचे नियोजन करून उष्माघातापासून संरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

Swapnil S

भिवंडी : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक उन्हाच्या लाहीने पक्षु-पक्ष्यांनी झाडांची सावली शोधणे सुरू केले आहे, तर मनुष्यप्राणीही नानातऱ्हेची शक्कल लढवताना दिसून येत आहे. यासह सर्वत्रच शीतपेयांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशाच प्रकारे उन्हाचा तडाखा वाढत असल्याने ठाणे जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ बैठकींसह वरिष्ठांच्या आदेशानुसार जि. प.च्या मराठी माध्यमिक शाळांच्या नियोजनात बदल करण्यात आले आहेत.

समर्थ बैठकींमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, तर जि.प. शाळांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याने सदर निर्णय घेण्यात आल्याचे समजते. महिला व विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वेळेत बदल करण्याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समर्थ बैठकीस जाणाऱ्या महिला आणि जि. प. शिक्षकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. समर्थ बैठकांचे नियोजन सकाळी ८ ते १०:३० यावेळेत ठेवण्यात आले आहे. तर जि. प. शाळांची वेळ ही सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

उष्माघात टाळण्यासाठी संबंधितांनी घेतलेल्या या निर्णयाचे महिला वर्ग व विद्यार्थ्यांमधून स्वागत होत असून याप्रमाणेच अन्य नोकरदार, कामगार, मजूर, चाकरमानी वर्गातून अशाच प्रकारे वेळेचे नियोजन करून उष्माघातापासून संरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक; ४० हजार रोजगारनिर्मिती होणार; ‘ग्रीन स्टील’ क्षेत्रात महाराष्ट्र ‘नंबर वन’ होणार - फडणवीस

महाराष्ट्रातील ४४ पक्षांसह देशातील ४७४ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

निवडणूक चौकीदारासमोरच मतचोरी; राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा; तो जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले!

Oscars 2026 : भारतातर्फे ऑस्करला ‘होमबाऊंड’ चित्रपट जाणार

सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण?