ठाणे

क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोचे ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Swapnil S

ठाणे : ठाणे, डोंबिवली आणि मुंबईकरांसाठी सेकंड होम म्हणून नाशिक हे सर्वाधिक पसंतीचे शहर असून ठाण्यात क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित तीन दिवसीय नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनामुळे ठाणे व मुंबईकरांचे हे स्वप्न पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, प्रदर्शनाचे समन्वयक मनोज खिवंसरा, सहसमन्वयक शाम कुमार साबळे, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड मॅनेजिंग कमिटी सदस्य नितीन पाटील, सागर शहा, अनंत ठाकरे व नाशिकमधील सर्व बांधकाम व्यावसायिक व मुंबई व ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की अशा प्रदर्शनाच्या निमित्ताने नाशिकचे ब्रांडीग होते. अनेक आघाडीचे विकासक यामध्ये सहभागी झाले असून फ्लॅट्स (२५ लाखापासून) प्लॉट (१० लाखापासून), फार्म हाऊस, शेत जमीन, व्यावसायिक असे असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. प्रदर्शन ठाणे पश्चिम येथे तीन हात नाका येथील टीपटॉप प्लाझा येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार असून या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नाशिकसोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागातील अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा