ठाणे

मुसळधार पावसात रिक्षाचालकांची लूट, परिवहन उपक्रमाकडून वेळेवर बस सेवा

केडीएमटी कडून कल्याणच्या दिशेने व दावडी, मिलापनगर बस सोडल्या

शंकर जाधव

डोंबिवली

मुसळधार पावसामुळे काही वेळ रेल्वे सेवा ठप्प झाली होती. प्रवासी वर्गाने घरी पोहोचण्यासाठी रिक्षाने प्रवास करणे पसंत केले मात्र वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत नेहमीप्रमाणे रिक्षाने लूट सुरू केली होती. तर काही रिक्षाचालकांनी जवळील भाडे नाकारल्याने नागरिक संतप्त झाले होते. तर केडीएमटी कडून कल्याणच्या दिशेने पाच, दावडी व मिलापनगर बस सोडल्या होत्या. मात्र इतर दिवसांपेक्षा जास्त प्रवासी वर्ग असल्याने बसेसमध्ये गर्दी झाली होती. तर बसची प्रतिक्षा करताना प्रवासी वर्गाची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र काही प्रवासी परिवहन उपक्रम व रिक्षाचालकांवर नाराज झाले होते. 

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी