ठाणे

दिव्यातील अनधिकृत शाळांवर करवाई करण्याची मागणी; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन

Swapnil S

ठाणे : दिवा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या ब्राइटन इंटरनॅशनल स्कूल खर्डीगाव व केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, सुदामा रेंजन्सी अशा एकूण दोन खासगी अनधिकृत इंग्रजी माध्यमाची आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम असलेली शाळा विनापरवाना सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. ही शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश ठाणे पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देऊन देखील शाळा सुरूच असल्याने पालिका शिक्षण मंडळाने अखेर कारवाईचा बडगा उभारत दोन्हीही शाळा चालकाविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा सल्लागार मंडळातर्फे पुन्हा कारवाई करण्याचे निवेदन मुख्यंमत्री कार्यालयास देण्यात आले आहे.

ब्राइटन इंटरनॅशनल स्कूल खर्डीगाव व केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, सुदामा रेंजन्सी या दोन्ही शाळा शासनाची मान्यता नसतानाही सुरू आहेत. या शाळेतील व्यवस्थापक व मुख्याध्यापकांनी या शाळेचे लेटर पॅड, मुख्याध्यापकांचे शिक्के, शाळेचे शिक्के, शाळा सोडल्याचे दाखले, फी पावती पुस्तक व देणगी पुस्तक पावत्या बोगसपणे तयार केलेल्या आहेत. शासनाची दिशाभूल करून इरादापत्र मिळवले असून शासन नियमांनुसार पाच गुंठा जमीन हवी असताना केंट शाळा रहिवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भरवली जाते.

अनधिकृत शाळेमुळे विद्यार्थ्यांची व समाजाची घोर फसवणूक होऊ शकते. सदर शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांची व समाजाची फसवणूक होणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात आले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल