ठाणे

डोंबिवली : ऐन गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तिकार पसार; भक्तांचे मोठे नुकसान

गणेशोत्सवाला अवघे काही तास बाकी असताना डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेशमूर्ती बनवणारा एक मूर्तिकार अचानक गायब झाल्याने शेकडो भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.

नेहा जाधव - तांबे

गणेशोत्सवाला अवघे काही तास बाकी असताना डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेशमूर्ती बनवणारा एक मूर्तिकार अचानक गायब झाल्याने शेकडो भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. गणेश भक्तांनी मूर्तीची ऑर्डर देऊन एडवान्स पैसेही दिले होते. मात्र, ऐन चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्ती न मिळाल्याने भविकांचा मोठा गोंधळ उडाला आहे.

जास्त ऑर्डर्सचा ताण पडला भारी

फुले रोडवरील ‘आनंदी कला केंद्रात’ दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्यात आले होते. मात्र, यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त ऑर्डर्स आल्याने मूर्तिकारावर प्रचंड ताण आला. एकट्याने एवढा मोठा भार उचलणे शक्य नसल्याने त्याने कार्यशाळा सोडून पलायन केल्याचे समजते.

गणेशोत्सव काही महिन्यांपूर्वीच मूर्तींची नोंदणी करून ठेवली जाते, जेणेकरून शेवटच्या क्षणी गर्दीतून बचाव होईल आणि हवी तशी मूर्ती वेळेत मिळेल. मात्र, डोंबिवलीतील या प्रकरणात प्रमाणापेक्षा जास्त बुकिंग स्वीकारल्याने शेवटी मूर्तिकार पळून गेला.

या घटनेमुळे बुकिंग केलेल्या भक्तांचे पैसे अडकले असून, अनेकांना हाताला मिळेल तिथून मूर्ती घ्यावी लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संतप्त भाविकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले