डोंबिवलीत टोईंग व्हॅन‌ नाही; वाहतूक पोलिसांचे डोंबिवली शहराच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष 
ठाणे

डोंबिवलीत टोईंग व्हॅन‌ नाही; वाहतूक पोलिसांचे डोंबिवली शहराच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष

डोंबिवली शहरात वाढत्या लोकसंख्येने शहरातील वाहनांची संख्या वाढली. वाहने वाढली पण वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटका नाही.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली शहरात वाढत्या लोकसंख्येने शहरातील वाहनांची संख्या वाढली. वाहने वाढली पण वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटका नाही. परिणामी रस्त्याच्या दुर्तफा पार्किंग होऊन वाहतूककोंडी वाढली. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन‌ची गरज लागते. मात्र परिवहन विभागाला याची गरज वाटतं नसल्याने डोंबिवलीला टोईंग व्हॅन‌ दिली नाही.

वाहतूक पोलीस यावर हात वर करत वरिष्ठांना त्यासंदर्भात पत्र दिले आहे, असे सांगतात. यावर माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक पोलिसांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात लवकरात लवकर टोईंग व्हॅन‌ धावली नाही तर आंदोलन करू, असा इशारा धात्रक यांनी दिला आहे.

धात्रक म्हणाले, शहर वाहतूक विभागाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅन‌द्वारे कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे वाहनचालकांमध्ये आदरयुक्त शिस्त निर्माण झाली होती आणि वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत होत होती.

तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र, डिसेंबर २०२५ पासून आज दिनांक ०३ जुलै २०२६ पर्यंत डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई बंद पडली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मालमत्ता पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव FSI वर प्रीमियम आकारणार, BMC च्या तिजोरीत कोट्यवधीची भर पडणार

Mumbai : सीसी रस्त्यांसाठी आणखी ६,६०० कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सीसी

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

यशोमती ठाकूर यांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

विशाखा राऊत यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश